Showing posts with label - संदीप जेजुरकर. Show all posts
Showing posts with label - संदीप जेजुरकर. Show all posts

Thursday, 6 June 2019

नांदगाव तालुक्याचे आरोग्य सांभाळणारा एक ' देवदूत '

         आपल्या रुग्णसेवेतून ज्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला व ज्यांना तालुक्यातील जनतेने ' दैवत्व ' बहाल केले असे डॉ.रोहण निंबाजी बोरसे..नांदगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट करत एक नव्हे दोन नव्हे तर ग्रामीण रुग्णालयाला व स्वकर्तृत्वामुळे डॉ.आनंदीबाई जोशी, कायाकल्प असे अनेक पुरस्कार ज्यांनी मिळवले आजही विविध संस्थाद्वारे त्यांना नेहमीच गौरविण्यात येते असे आमचे मोठे बंधू तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे..ग्रामीण रुग्णालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री.बोरसे यांनी रुग्णालयाचा कायापालट सुरु केला..जिथे ४५ ते ५० बाह्यरुग्ण तपासले जायचे तिथे आज मात्र ३०० हुन अधिक बाह्यरुग्ण तपासले जातात..सर्पदंश, अपघात , साथीचे आजार आदी रुग्णांची येथे मोठी संख्या असते.पण डॉ.बोरसे आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी निस्वार्थ भावनेने आपली रुग्ण सेवा बजावत असतांना रुग्णाबरोबर एक भावनिक नातेही जोडत असते..ग्रामीण रुग्णालय, नांदगावची एक वेेगळी ओळख तयार झाली आहे.गरोदर महिलांची प्रसूती कशी ही असो अगदी सहजरीत्या ती रुग्णालयात प्रसूत होणारच.. हा या रुग्णालयाचा विशेष हातखंडा..मागील एक वर्षात तब्बल १ हजाराहून अधिक महिला प्रसूत होण्याचा आकडा पार केला गेला..कोकणातील सर्पदंशावरील उपचारात प्रसिद्ध असलेले डॉ. बावस्कर यांच्या पुस्तकांचे वाचन करून प्रेरित झालेल्या डॉ.रोहन बोरसे यांनी आजतागायत अनेक सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविलेले आहे..प्रसंगी आजही ते डॉ.बावस्कर यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत सर्पदंशावरील अधिक उपचाराविषयी माहित घेत असतात..ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.रोहण बोरसे हे नुसतीच नोकरी न करता त्यातुन मोठ्या प्रमाणात समाज सेवा देखील करतात..स्मितभाषी व नम्रता अंगिकारलेल्या डॉ.बोरसे हे तालुक्यात आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर ' किर्तीवंत ' झाले आहे..साकोरा ( ता. नांदगाव ) येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ.रोहन बोरसे यांचे कुटुंबीय सध्या नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत..पण वडील निंबाजी बोरसे यांचा खास आग्रह असल्याने व जन्मभूमी असलेल्या नांदगावं तालुक्यात जर सेवा बजावता येईल तर विशेष असा आनंद होईल अशी वडीलांची इच्छा होती..त्यानुसार २०११ या वर्षी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकपदावर त्यांची नियुक्ती झाली..आणि वडिलांच्या इच्छेनुसार आपल्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी या संधीचे सोने केले..विविध समस्यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालय हे ग्रासलेले होते.जेव्हा डॉ.रोहण बोरसे यांनी या रुग्णालयाची सूत्रे हातात घेतली तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी रुग्णालयाचा चेहरा -मोहराच बदलवत एक वेगळी ओळख निर्माण केली..गरुजू रुग्णांना आपल्या खिशातील पैसे देवून पुढील उपचारासाठी मदत देखील केल्याचे अनेक उदाहरणे त्यांचे आहेत.समाजाप्रती असलेले त्यांचे प्रेम या माध्यमातून दिसून येते..अगदी मोजक्या संख्येने ग्रामीण रुग्णालयाची उपचारासाठी वाट धरणारे आज शेकडोच्या संख्येने दाखल होतात..अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने देखील हे रुग्णालय आता सुसज्ज होत आहे..ग्रामीण रुग्णालयातील माझे सर्व कर्मचारी निष्ठेने काम करतात.त्या कामाच्या प्रति निष्ठा असल्याने यश आपोआपच मिळत असते.माझ्या वडिलांनी दिलेला मोलाचा सल्ला आत्मसात करून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून काम सुरु केले.समस्त नांदगावकरांच्या सहकार्यामुळेच विविध पुरस्कारांपर्यंत मजल मारता आल्याचे श्री.बोरसे सांगत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतात..डॉ.रोहण बोरसे यांच्याविषयी शेवटी एकच म्हणावं लागत की नांदगाव तालुक्याचं आरोग्य जोपासणारा एक देवदूतच आमच्या तालुक्याला लाभला आहे..ज्या देवाने मलाही एकदा ' जीवदान ' दिलं आहे..

- संदीप जेजुरकर

  सदस्य - रुग्ण कल्याण समिती
  ग्रामीण रुग्णालय,नांदगाव ( नाशिक ) 

- ९४२३१५१०८९


Sunday, 19 August 2018

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली..ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या...

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
      ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या...

नांदगाव : संदीप जेजुरकर

        संपूर्ण शरीर हे व्याधींनी ग्रासलेले..उदरनिर्वाहाचे काहीही साधन नाही..सध्या दोन वेळची जेवणाची भ्रांंत..कुणी दिलं तर 
खायचं..नाही भेटलं तर तसंच पडून राहायचं..रहायला हक्काचा निवारा नाही..आपल्या काडकीच्या झोपडीत कसंबसं पडून रहायचं..आणि आजचा दिवस उद्यावर ढकलायचा..एवढीच त्याची दिनचर्या..अठरा विश्वे दारिद्रय पाचीला पुजलेल्या रंगनाथ पवार यांना ' कुणी घर देतं का घर ' अशी म्हणण्याची वेळ आलेली असतांनाच सामाजिक कार्य करणाऱ्या युवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने त्यास मदतीचा हात दिला.. रविवार सुटीचा दिवस असतांना कुठेतरी मौज मजा एन्जॉय करण्यात दिवस घालवायचा हे आजच्या तरुणाईचं ब्रीद ठरलेलं असतांना ' युवा फाउंडेशन ' या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यास फाटा देत ' एक हात मदतीचा ' हि संकल्पना राबवत श्रमदान करून श्री.पवार यांच्या झोपडीची दुरुस्ती केली..झोपडीची सुस्थितीतील दुरुस्ती बघून रंगनाथ पवार यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या..आपले थरथरते हात उंचावून त्याने या युवकांना आशीर्वाद देत ' तुमचं कल्याण होईल ' असा आशीर्वाद दिला..कैलास नगर जवळील एका वस्तीवर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रंगनाथ पवार हे एका दयनीय अवस्थेतील आपल्या झोपडीत कसेबसे दिवस काढत असत.पावसाळा सुरू झाला की हे गृहस्थ रात्र रात्र जागून काढत होते.उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूत चोहो-बाजूने उघडीच असलेली हि झोपडी शेवटच्या घटका मोजत होती. दिवाळीचे फरसाण व कपडे वाटप करण्यासाठी गेलेल्या युवा फाउंडेशनच्या नजरेत हि झोपडी खटकली होती..आणि आज या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत या झोपडीची दुर्दशा दूर करण्याचे ठरवले आणि आपल्या सवंगड्यांसह झोपडी दुरुस्ती करत रविवारची सुट्टी खऱ्या अर्थाने सत्कारणी लावली..या झोपडीच्या चारही बाजू बंद करीत एक नवी कोरी ताडपत्री त्यावर अंथरूण कायमचा भक्कम असा निवारा श्री.पवार यांना करून दिला..या श्रमदानात छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर यांचे मोठे योगदान लाभले तर झोपडी दुरुस्तीसाठी युवा फाउंडेशनचे प्रसाद वडनेरे, सुमित सोनवणे, रूषी जाधव, विकास शर्मा, धनराज शिदें, गौरव रूणवाल, सद्दाम शेख, मुज्जु शेख, मयुर लोहाडे, राहिल सैय्यद, गणेश सांगळे, तौसिफ शेख, साद शेख, सचिन धामणे, राहुल ठोके आदींनी मदत केली..

Sunday, 31 December 2017

शुभेच्छा..नवीन वर्षाच्या...

📌📌

नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!

            २०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..
         मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही  सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या  ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

- संदीप जेजुरकर, नांदगाव
  

नूतन वर्षाभिनंदन...!

📌📌

नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!

            २०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही  सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या  ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...

- संदीप जेजुरकर, नांदगाव