📌📌
नमस्कार...
माझ्या सर्व मित्र परिवाराला...!
२०१७ हे वर्ष कसे गेले..यावर अनेकांनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अपच्या माध्यमातून आपल्या भावना विषद करत पोस्ट केल्या...कुणी नवीन वर्षाचे संकल्प केलेत तर कुणी मागील वर्षात घडलेल्या आठवणींना उजाळा देत..नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करीत आहे..येणाऱ्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मनात एक विचार आला कि आपणही २०१७ हे वर्ष आपल्याला कसं वाटलं याविषयी आपले विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त करावेत थोडासा संवाद साधावा म्हणून केलेला हा शब्द प्रपंच..
मित्रांनो उगवलेला प्रत्येक दिवस हा मावळणारच असतो..त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरु झालं की ते देखील संपणारच यात काही शंकाच नाही..म्हणजे वर्ष संपलं यात विशेष काहीच नाही..येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचाच दिवस आहे..असे समजून मी मागील प्रत्येक दिवस हा एन्जॉय ( साजरा ) करतोय..आणि पुढील २०१८ या नवीन वर्षातही तेच करणार आहे..प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सुख दुःख व इतर अनेक घटना घडत असतात..अर्थात सरळ रस्त्याला असलेले वळण व चढ उतार येतात त्या प्रमाणे माणसाच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येत असतात..सुखाचे अनेक प्रसंग मागील वर्षी ( २०१७ ) माझ्या नशिबी आले..तसेच काही प्रसंग माझ्याही आयुष्यात आले..कधी गंभीर स्वरूपाचे तर कधी थोडेसे सॉफ्ट ( हलकेसे ) देखील..या प्रसंगात माझ्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी, माझ्या सर्व जिवलग मित्र परिवाराने व माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठी साथ दिली..जिथे साक्षात मृत्यू माझ्या समोर येऊन दाखल झाला आहे असे मला वाटत असतांना.." तुला काहीच झाले नाही " असे माझ्या मित्रांचे बोल मला त्या मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले..अचानक झालेल्या या घटनेने मी ही गोंधळलेलो होतो..काय होतंय किंवा काय झालंय हे मलाही समजत नव्हतं..आजही मी तो विचार करायला लागलो कि तो घडलेला प्रसंग मला आठवतो..व मी स्तब्ध होतो..प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला सामोरे जाणारा मी या प्रसंगाला मात्र घाबरलो...खूप मोठी हिम्मत माझ्यात होती..पण आता मात्र ती हिम्मत जरा कमी झालेली मला वाटते.. असो.. यापलीकडे मागील ( २०१७ ) या वर्षात खूप काही गमावलं अथवा कमावलं असं झालेलं नाही..मित्र परिवाराची संख्या मोठी कमावली आजही ती वाढतच आहे..खूप काही अनुभव मिळाले..त्यात अनेक गोष्टी शिकायला देखील मिळाल्या..पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले...पुरस्कारही मागील वर्षी पदरात पडला..नावलौकिक मिळवतांना अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर दिली..सामाजिक कार्यात स्वताला गुंतवून घेतलं..परिवाराची हि मोठी साथ यात मिळत असते..अजूनही खूप काही करायचे आहे..या सर्व घडामोडीत दैनंदिन जीवन जगत असतांना कुणाच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या नाही..ज्यांच्या म्हणून दुखावल्या गेल्या असतील त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं..येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही संकल्प न करता " एक माणूस " म्हणून जसं आजपर्यंत जगत आलोय तेच पुढील काळातही " एक माणूस " म्हणूनच मला जगायचं आहे..प्रत्येक दिवस हा नवीन दिवस व नवीन वर्ष म्हणून जगायचं आहे..येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आनंद मिळवायचा आहे..आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस हा माझ्या आयुष्यतील शेवटचा दिवस म्हणून मी जगणार आहे..' लाईफ एन्जॉय ' करणार आहे..हाच संकल्प मी आजपासून केलेला आहे..पुनश्च एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराला हे नवीन वर्ष सुख - समृद्धीचे व भरभराटीचे जावो..येणाऱ्या ( २०१८ ) या वर्षात आपल्या सर्वांच्या हातून आई - वडिलांची सेवा,समाजसेवा व देशसेवा घडो..ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा...
- संदीप जेजुरकर, नांदगाव
No comments:
Post a Comment