जिल्हा परिषदेच्या गटातील ३ व पंचायत समिती गणातील ३ असे एकूण ६ अर्ज छाननीनंतर नामंजूर..
नांदगाव : संदीप जेजुरकर
नामनिर्देशन अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नसल्याने व सूचक नसल्याचे कारणावरून आज जिल्हा परिषदेच्या गटातील ३ व पंचायत समिती गणातील ३ असे एकूण ६ अर्ज छाननीनंतर नामंजूर करण्यात आले.
छाननीनंतर अवैध ठरवलेल्या उमेदवारांमध्ये भालुर गटातील भाजपच्या आशाबाई फकिरा जगताप,जातेगाव गटातील अपक्ष सुनंदा मुक्ताराम बागुल,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुनीता भाऊसाहेब धीवर यांचे तर सावरगाव गणातील अपक्ष उमेदवार सुरेखा अप्पासाहेब सरोदे ,भालुर गणातील अपक्ष उमेदवार पुंडलिक लक्ष्मण माळी,भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे फकिरा बाबुराव पवार यांचा समावेश आहे.नामनिर्देशन अर्ज अवैध ठरण्याची शक्यता बाळगून राजकीय पक्षांनी तशी काळजी घेत या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत ए.बी.फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचे देखील नाव दिल्याने पक्षाची अधिकृत उमेदवारी ठरलेल्या उमेदवाराला न मिळता पर्यायी म्हणून दिलेल्या उमेदवाराची मात्र आता अधिकृत उमेदवारी मिळाल्याने लॉटरी लागली आहे.छाननीनंतर जिल्हा परिषद गटासाठी ५४ तर पंचायत समिती गणासाठी ९१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहे.दरम्यान ज्यांचे अर्ज अवैध ठरले त्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात न्याय मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाचे दार ठोठावले आहे..
No comments:
Post a Comment