नांदगाव : संदीप जेजुरकर
लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवरदेवाने आपली वरात थेट मतदान केंद्रात नेल्याने तालुक्यात तो चर्चेचा विषय बनला..जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुक आणी विवाह मुहूर्त एकाच दिवशी आल्याने परधाड़ी ( ता.नांदगाव ) येथील कुणाल संजय गायकवाड याने पहिली पसंती मतदानाला देत त्यानंतर बोहल्यावर चढणे पसंत केले..नवरदेवाने मतदान करीत सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करा असा संदेश त्याने यावेळी दिला.विवाह म्हटला की वरात आलीच.. त्यानुसार कुणाल याची वरात गावातून वाजत गाजत निघाली..वाजत गाजत निघालेली नवरदेवाची वरात मंडपाऐवजी थेट मतदान केंद्रात दाखल झाल्याने काहीवेळ काय झाले हेच कुणाला कळेना..त्यानंतर घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने मतदान केंद्र गाठत अगोदर मतदान केले...आणि रत्नापिंपरी ता. पारोळा येथील लतिका सोबत जि. प., पं. स निवडणूकीच्या मतदान दिवशी विवाहबद्ध झाला.या घटनेने निश्चितच परिसरातील सर्वच मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून या अनोख्या मतदानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून दिवसभर हा चर्चेचा विषय ठरला.मतदानाचा दिवसेंदिवस घसरणारा टक्का बघता शासन, सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी,सेलिब्रिटी मतदान असे आवाहन करत असतांना नियोजीत उपवर असलेल्या कुणालने देखिल मतदान करा असा संदेश यावेळी दिला..
No comments:
Post a Comment