Thursday, 23 February 2017

नांदगाव तालुक्यात गट व गणात शिवसेनेचे वर्चस्व...भाजपची दमदार एंट्री..तर राष्ट्रवादीचा दारुण पराभव...

नांदगाव : संदीप जेजुरकर
        
                 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या  निवडणुकीत शिवसेनेने तालुक्यातील आपले वर्चस्व अबाधित राखत २ गट व ५ गणावर निर्विवाद विजय मिळवला.काँग्रेसने अश्विनी आहेर यांच्या रूपाने न्यायडोंगरी हा आपला गट शाबूत ठेवला.माजी आमदार संजय पवार यांच्या नेत्रृत्वाखाली भाजपच्या वाट्याला भालुर गटात १ तर गणात ३ जागा मिळवीत दिमाखदार एन्ट्री केली. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या निवडणुकीत गट व गणात एकही जागा मिळविता आली नाही.बहुचर्चित असलेल्या न्यायडोंगरी गटात 'आजी विरुद्ध नाती'च्या लढाईत काँग्रेसच्या अश्विनी आहेर या नातीने विजय संपादन करून आपली आजी असलेल्या शिवसेनेच्या विजया आहेर यांना १७१४ मतांनी पराभूत केले.तर पंचायत समितीच्या सावरगाव गणात काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या राजाबाई सोनवणे यांचा पराभव करत शिवसेनेच्या विद्या पाटील यांनी १३० मतांनी निसटता विजय मिळविला..दरम्यान आजच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेची घौडदौड कायम ठेवली असून राष्ट्रवादीचा मात्र या निवडणुकीत दणकून पराभव झाला.आमदार पंकज भुजबळ यांनी लढविलेली एकाकी खिंड त्यांना विजयापर्यंत नेवू शकली नाही.
साकोरा गटात शिवसेनेच्या रमेश उग्रसेन बोरसे यांनी १० हजार ५८ मते मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित उमेदसिंग बोरसे यांचा पराभव केला.अमित बोरसे यांना ६ हजार ८८९ मते मिळाली.भाजपाचे दिलीप गोविंद पगार यांना तिसऱ्या क्रमांकाची २ हजार २२६ मते मिळाली.जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या न्यायडोंगरी गटात काँग्रेसच्या अश्विनी आहेर यांनी शिवसेनेच्या विजया आहेर या आपल्या आजीचा पराभव केला.अश्विनी आहेर यांना ९ हजार ६३६ मते मिळाली तर विजया आहेर यांना ७ हजार ९२२ मते मिळाली.भालुर गटात भाजपाने दिमाखदार एंट्री करत आशाबाई फकिरा जगताप यांनी ११ हजार ५९ मते मिळवले.शिवसेनेच्या प्रतिभा दशरथ लहिरे यांचा त्यांनी पराभव केला.प्रतिभा लहिरे यांना ८ हजार ८७८ मते मिळाली.यंदाच्या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या जातेगाव गटात शिवसेनेच्या सुनीता मछिंद्र पठाडे यांनी ९ हजार २४३ मते मिळवीत काँग्रेसच्या अलका चिंधू बागुल यांचा पराभव केला अलका बागुल यांना ५ हजार १३१ मते मिळाली.या गटात मनसे च्या एकमेव उमेदवार असलेल्या वैशाली शेषराव गायकवाड यांना ४ हजार ४८४ मते मिळाली.वेहेळगाव गणात शिवसेनेचे सुभाष चिंधू कुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नम्रता रमेश पगार यांचा २ हजार ३४४ मतांनी पराभव केला श्री.कुटे यांना ५ हजार ७२१ मते मिळाली तर नम्रता पगार यांना ३ हजार ३७७ मते मिळाली.शिवसेनेच्या सुमन विष्णू निकम यांनी ४ हजार १२३ मते मिळवत राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या सुंदराबाई तात्याराव खैरनार यांचा पराभव केला. सुंदराबाई खैरनार यांना ३ हजार ३५५ मते मिळाली.चुरशीच्या झालेल्या सावरगाव गणात शिवसेनेच्या विद्यादेवी एकनाथ पाटील यांनी ३ हजार ९३९ मते मिळवून काँग्रेसच्या सखुबाई दत्तात्रय शेलार यांचा पराभव केला सखुबाई शेलार यांना ३ हजार ८०९ मते मिळाली.न्यायडोंगरी गटात काँग्रेसने यश मिळविले असले तरी न्यायडोंगरी गणात मात्र काँग्रेसला आपली जागा वाचवता आली नाही.शिवसेनेच्या आशा किशोर आहेर यांनी ४ हजार ७३७ मते मिळवत काँग्रेसच्या राजाबाई शंकर सोनावणे यांचा पराभव केला.सोनवणे यांना ४ हजार ३१२ मते मिळाली.नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले गंगाधर बिडगर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला भाजपाच्या साहेबराव राघो नाईकवाडे यांनी ५ हजार ३३५ मते मिळवत त्यांचा पराभव केला.बिडगर यांना ४ हजार ४६७ मते मिळाली. भालुर गणात भाजपाच्या श्रावण वामन गोरे यांनी ५ हजार ६०७ मते मिळाली त्यांनी शिवसेनेच्या संजय किसन पवार यांचा पराभव केला.श्री.पवार यांना ४ हजार ४३२ मते मिळाली.चुरशीची लढत झालेल्या मांडवड गणात शिवसेनेच्या भाऊसाहेब विठ्ठल आहेर यांनी ४ हजार ६३६ मते मिळवून बाजी मारली.भाजपाच्या विठ्ठल काशिनाथ आहेर यांचा त्यांनी पराभव केला.विठ्ठल आहेर यांना ३ हजार ३३९ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास सुभाष पाटील यांना ३ हजार ३ मते मिळाली.जातेगाव गणात अपक्षांसह ५ जण या लढतीत होते. भाजपाच्या मधुबाला खिरडकर यांनी २ हजार ७३५ मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री महेंद्र लाठे यांचा पराभव केला.लाठे यांना २ हजार ११८ मते मिळाली. तर शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गायकवाड ह्या १ हजार ९१८ मते मिळवून तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेल्या.निकाल जाहीर होताच विजयी झालेल्या उमेदवार समर्थकांनी जल्लोष साजरा केला.निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत देवगुणे,नोडल अधिकारी रचना पवार,पद्मश्री तासगावकर,मीनाक्षी बैरागी,तसेच सहाय्यक म्हणून संतोष डुंबरे यांनी काम बघितले सकाळी साडेदहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.                                                     

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक - २०१७ 

गट व गणनिहाय उमेदवारांना मिळालेली मते -  

जातेगाव गट  - 

वैशाली शेषराव गायकवाड ( मनसे ) - ४४८४
सुनीता मच्छिंद्र पठाडे ( शिवसेना ) - ९२४३ √
अलका चिंधा बागुल ( काँग्रेस ) - ५१३१
नोटा - ५१५
एकुण - १९३७३

भालुर गट - 

आशाबाई फकीरा जगताप ( भा.ज.पा ) - ११०५९ √
श्वेता प्रशांत ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) - १७२२
प्रतिभा दशरथ लहिरे ( शिवसेना ) - ८८७८
नोटा - ३५२
एकूण - २२०११

साकोरा गट - 

दिलीप गोविंद पगार ( भाजप ) - २२२६
अमित उमेदसिंग बोरसे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ६८८९
रमेश उग्रसेन बोरसे ( शिवसेना ) - १००५८ √
उमेश विजय भाबड ( अपक्ष ) - ७८२
भगवान नामदेव सोनवणे ( अपक्ष ) - ३६६
नोटा - १८९
एकुण - २०५१०

न्यायडोंगरी गट  - 

अश्विनी अनिल आहेर ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) - ९६३६ √
विजया विजय आहेर ( शिवसेना ) - ७९२२
लताबाई धनराज बुरकूल ( भारतीय जनता पार्टी ) - ९९४
गायत्री शशिकांत मोरे ( अपक्ष  ) - २९५८
जमुनाबाई देवचंद मोरे ( अपक्ष ) - १५०
नोटा - २१५
एकुण - २१८७५

वेहेळगाव गण - 

सुभाष चिंधू  कुटे ( शिवसेना ) - ५७२१ √
नम्रता रमेश पगार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ३३७७
भानुदास पोपट पाटील ( अपक्ष ) - ३४४
विजया विलास भाबड ( भारतीय जनता पार्टी ) -१२२९
नोटा - १६०
एकुण - १०८३१

साकोरा गण - 

उषा श्रावण आढाव ( अपक्ष ) - १३२
सुंदराबाई तात्याराव खैरनार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ३३५५
सुमन विष्णु निकम ( शिवसेना ) - ४१२३ √
माधुरी महेंद्र बोरसे ( अपक्ष ) - १७०६
ज्योती दीपक म्हस्के ( भारतीय जनता पार्टी ) - २९४
नोटा - ६९
एकुण - ९६७९

सावरगाव गण - 

मीराबाई भाउराव निकम ( भारतीय जनता पार्टी ) - १५७७
विद्यादेवी एकनाथ पाटील ( शिवसेना ) -३९३९ √
सखुबाई दत्तात्रय शेलार ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) - ३८०९
सोनाली परशराम सरोदे ( अपक्ष ) - १०८०
नोटा - १०६
एकुण - १०५११

न्यायडोंगरी गण 

गजराबाई विश्वनाथ आहिरे ( भारतीय जनता पार्टी ) - ५४६
आशा किशोर आहेर ( शिवसेना ) - ४७३७ √
विमलबाई फकीरा पवार ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ) - २११
शकुंतला कैलास मोरे ( अपक्ष ) -२८५
पारुबाई युवराज वाघ ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) - ७७८
राजाबाई शंकर सोनवणे ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) ४३१२
नोटा - ४९५
एकुण - ११३६४

पानेवाडी गण                

साहेबराव राघो नाईकवाडे ( भारतीय जनता पार्टी ) - ५३३५ √
गंगाधर हरी बिडगर ( शिवसेना ) - ४४६७
चिमा धोंडू शिंदे ( अपक्ष ) - ४३१
संजय अप्पा शेरमळे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ३९२
नोटा - ९७
एकुण - १०७२२

भालूर गण   

श्रावण वामन गोरे ( भाजप ) - ५६०७ √
संजय किसन पवार ( शिवसेना ) - ४४३२
शांताराम दादा लोखंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ११५२
नोटा - ९८
एकूण - ११२८९

मांडवड गण 

विठ्ठल काशीनाथ आहेर ( भारतीय जनता पार्टी ) - ३३३९ 
कैलास सुभाष पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - ३००३
भाऊसाहेब विठ्ठल हिरे ( शिवसेना ) - ४६३६ √
नोटा - १९३
एकुण - ११३७१

जातेगाव गण 

मधुबाला रावसाहेब खिरडकर ( भारतीय जनता पार्टी ) -  २७३५ √
लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड ( अपक्ष ) - ८८६
रजनी हरिभाऊ त्रिभुवन ( शिवसेना ) - १९१८
मनीषा संतोष भैरव ( अपक्ष ) - २२६
जयश्री महेंद्रकुमार लाठे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) - २११८
नोटा - ११९
एकुण - ८००२

-- 

Thanks...
& Regards...!

Sandip Jejurkar
Nandgaon ( Nashik )

Hello : 9423151089

Tuesday, 21 February 2017

नवरदेवाची वरात थेट..मतदान केंद्रात...

नांदगाव : संदीप जेजुरकर

              लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवरदेवाने आपली वरात थेट मतदान केंद्रात नेल्याने तालुक्यात तो चर्चेचा विषय बनला..जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुक आणी विवाह मुहूर्त एकाच दिवशी आल्याने परधाड़ी ( ता.नांदगाव ) येथील कुणाल संजय गायकवाड याने पहिली पसंती मतदानाला देत त्यानंतर बोहल्यावर चढणे पसंत केले..नवरदेवाने मतदान करीत सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करा असा संदेश त्याने यावेळी दिला.विवाह म्हटला की वरात आलीच.. त्यानुसार कुणाल याची वरात गावातून वाजत गाजत निघाली..वाजत गाजत निघालेली नवरदेवाची वरात मंडपाऐवजी थेट मतदान केंद्रात दाखल झाल्याने काहीवेळ काय झाले हेच कुणाला कळेना..त्यानंतर घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने मतदान केंद्र गाठत अगोदर मतदान केले...आणि रत्नापिंपरी ता. पारोळा येथील लतिका सोबत जि. प., पं. स निवडणूकीच्या मतदान दिवशी विवाहबद्ध झाला.या घटनेने निश्‍चितच परिसरातील सर्वच मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून या अनोख्या मतदानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून दिवसभर हा चर्चेचा विषय ठरला.मतदानाचा दिवसेंदिवस घसरणारा टक्का बघता शासन, सामाजिक संस्था,लोकप्रतिनिधी,सेलिब्रिटी मतदान असे आवाहन करत असतांना नियोजीत उपवर असलेल्या कुणालने देखिल मतदान करा असा संदेश यावेळी दिला..

Thursday, 9 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक - २०१७ छाननीनंतर गट व गणासाठी वैध असलेले उमेदवार..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक - २०१७ ( नांदगाव तालुका )

छाननी नंतर वैध झालेले उमेदवार खालील प्रमाणे  - 

साकोरा गट - 

रमेश पगार ( अपक्ष - २ ) दिलीप पगार ( भाजप १ व अपक्ष १ ) नम्रता पगार ( अपक्ष -२ ) नाना चांदवडे ( अपक्ष -२ ) सुभाष कुटे ( अपक्ष - २ ) सीताराम बोरसे ( अपक्ष ) अमित बोरसे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) उमेश भाबड ( अपक्ष ) भगवान सोनवणे ( अपक्ष ) सुकदेव खैरनार ( अपक्ष ) तुषार पवार ( अपक्ष ) महेंद्र बोरसे ( अपक्ष ) रमेश बोरसे ( शिवसेना )

न्यायडोंगरी गट  - 

अश्विनी आहेर ( इंडियन नॅशनल काँग्रेस - १ व अपक्ष - १) गायत्री मोरे ( अपक्ष - २ ) पल्लवी आहेर ( अपक्ष - २ ) विजया आहेर ( शिवसेना १ अपक्ष - २ ) अलका आहेर ( अपक्ष - २ ) अश्विनी आहेर ( अपक्ष ) जमुनाबाई मोरे ( अपक्ष ) छाया आहेर ( अपक्ष ) लताबाई बुरकूल ( भारतीय जनता पार्टी ) 

भालुर गट - 

छाया फुलमाळी ( भारतीय जनता पार्टी - १ व अपक्ष - १ ) मीनाबाई निकम ( अपक्ष -२ ) मंदाबाई सोनवणे ( अपक्ष -२ ) प्रतिभा लहिरे ( शिवसेना १ व अपक्ष - १ )  स्वेता ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) नंदाबाई आहिरे ( अपक्ष )

जातेगाव गट - 

अलका बागुल ( इंडियन नॅशनल काँग्रेस - १ व अपक्ष - १ ) सुनंदा बागुल ( अपक्ष - १ ) मनीषा काटकर ( अपक्ष - २ ) पूजा भैरव ( अपक्ष ) वैशाली गायकवाड ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) संगीता आहेर ( अपक्ष ) सुनीता पठाडे ( शिवसेना ) 

वेहेळगाव गण - 

नम्रता पगार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १ व अपक्ष १ ) भानुदास पाटील ( अपक्ष -२ ) रत्नाबाई मोरे ( अपक्ष -२ ) संतोष गिते ( अपक्ष - २ ) कुणाल आहेर ( अपक्ष - २ ) सुभाष कुटे ( शिवसेना १ अपक्ष १ ) राजेंद्र आहेर ( अपक्ष ) विजया भाबड ( भारतीय जनता पार्टी ) पोपट सानप ( अपक्ष ) रमेश पगार ( अपक्ष ) अनंतराव इनामदार ( अपक्ष ) 

साकोरा गण - 

सुमन निकम ( शिवसेना १ अपक्ष १ ) मीराबाई सुरसे ( अपक्ष ) अनिता सोनवणे ( अपक्ष ) सुंदराबाई खैरनार ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) ज्योती म्हस्के ( भारतीय जनता पार्टी ) उषा आढाव ( अपक्ष ) माधुरी बोरसे ( अपक्ष ) सुरेखा पैठणकर ( अपक्ष ) विमल खैरनार ( अपक्ष ) 

सावरगाव गण - 

सुरेखा शेलार ( शिवसेना १ व अपक्ष १ ) सोनाली सरोदे ( अपक्ष - २ ) सखुबाई शेलार ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) मीराबाई निकम ( भारतीय जनता पार्टी ) नर्मदाबाई भुसारे ( अपक्ष ) लता सरोदे ( अपक्ष ) रत्नाबाई पाटील ( अपक्ष ) विद्यादेवी पाटील ( अपक्ष ) सविता पाटील ( अपक्ष ) भाग्यश्री मोरे ( अपक्ष ) 

न्यायडोंगरी गण 

 पारुबाई वाघ ( महराष्ट्र नवनिर्माण सेना १ व अपक्ष १ ) सखुबाई मेंगाळ ( अपक्ष ) शकुंतला मोरे ( अपक्ष ) मीना मोरे ( अपक्ष ) सिंधूबाई माळी ( अपक्ष ) गजराबाई आहिरे ( भारतीय जनता पार्टी ) आशा आहेर ( शिवसेना ) राजाबाई सोनवणे ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) मिनाबाई पवार ( अपक्ष ) विमलबाई पवार ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ) 

पानेवाडी गण                

संजय शेरमळे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १ व अपक्ष १ ) गंगाधर बिडगर ( शिवसेना ) दिनकर यमगर ( अपक्ष ) भाऊसाहेब वडगर ( अपक्ष ) कमलाकर साँगळे ( अपक्ष ) सुरक्षा केसकर ( अपक्ष ) चिमा शिंदे ( अपक्ष ) साहेबराव नाईकवाडे ( भारतीय जनता पार्टी ) कैलास काजीकर ( अपक्ष ) अंकुश कातकडे ( अपक्ष ) शशीकला पवार ( अपक्ष )

भालूर गण   

श्रावण गोरे ( अपक्ष - २ ) मांगीलाल माळी ( अपक्ष ) शांताराम लोखंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) अशोक जाधव ( अपक्ष -२) विष्णू सोनवणे ( अपक्ष ) मंगलाबाई पवार ( अपक्ष ) संजय किसन पवार ( शिवसेना ) 

मांडवड गण 

कैलास पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १ व अपक्ष १ ) भाऊसाहेब हिरे ( शिवसेना १ अपक्ष १ ) विठ्ठल आहेर ( भारतीय जनता पार्टी १ व अपक्ष १ ) जिजाबाई आहेर ( अपक्ष ) प्रभाकर कवडे ( अपक्ष ) भगवान काकळीज ( अपक्ष ) हेमंत पाटील ( अपक्ष ) नितीन चोळके ( अपक्ष ) सागर भिलोरे ( अपक्ष ) 

जातेगाव गण 

मनीषा भैरव ( अपक्ष- २ ) मधुबाला खिरडकर ( भारतीय जनता पार्टी ) लक्ष्मीबाई गायकवाड ( अपक्ष ) मनीषा काटकर ( अपक्ष ) जयश्री लाठे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) रजनी त्रिभुवन ( शिवसेना ) सुनीता धीवर ( अपक्ष )  

-- 

Thanks...

Sandip Jejurkar 
Nandgaon ( Nashik )
Hello : 9423151089,9850881089

Tuesday, 7 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक - २०१७

जिल्हा परिषदेच्या गटातील ३ व पंचायत समिती  गणातील ३ असे एकूण ६ अर्ज छाननीनंतर नामंजूर..

नांदगाव : संदीप जेजुरकर
      
          नामनिर्देशन अर्जासोबत दाखल केलेल्या  प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नसल्याने व सूचक नसल्याचे कारणावरून आज जिल्हा परिषदेच्या गटातील ३ व पंचायत समिती गणातील ३ असे एकूण ६ अर्ज छाननीनंतर नामंजूर करण्यात आले.
छाननीनंतर अवैध ठरवलेल्या उमेदवारांमध्ये भालुर गटातील भाजपच्या  आशाबाई फकिरा जगताप,जातेगाव गटातील अपक्ष सुनंदा मुक्ताराम बागुल,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुनीता भाऊसाहेब धीवर यांचे तर सावरगाव गणातील अपक्ष उमेदवार सुरेखा अप्पासाहेब सरोदे ,भालुर गणातील अपक्ष उमेदवार पुंडलिक लक्ष्मण माळी,भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे फकिरा बाबुराव पवार यांचा समावेश आहे.नामनिर्देशन अर्ज अवैध ठरण्याची शक्यता बाळगून राजकीय पक्षांनी तशी काळजी घेत या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत ए.बी.फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचे देखील नाव दिल्याने पक्षाची अधिकृत उमेदवारी ठरलेल्या उमेदवाराला न मिळता पर्यायी म्हणून दिलेल्या उमेदवाराची मात्र आता अधिकृत उमेदवारी मिळाल्याने लॉटरी लागली आहे.छाननीनंतर जिल्हा परिषद गटासाठी ५४ तर पंचायत समिती गणासाठी ९१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहे.दरम्यान ज्यांचे अर्ज अवैध ठरले त्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात न्याय मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाचे दार ठोठावले आहे..