खेळ कुणाला दैवाचा कळला...
" ज्या वेळेस मी ह्या जगाचा निरोप घेईल त्या वेळेस माझ्या मुळे माझा वृत्तपत्र वाचक अडून राहणार नाही.." हे बापूंचे गमतीचे ठरलेले वाक्य..पण हे वाक्य खरे ठरवीत ( दि.१६ ऑगस्ट ) वृत्तपत्रांना सुट्टी असलेल्या दिवशीच या जगाचा गजानन ( बापू ) आहेर यांनी निरोप घेतला..वृत्तपत्र व्यवसायाशी त्यांची जुळलेली नाळ किती घट्ट होती यातून हे स्पष्ट होते..
गणेश न्यूज एजन्सीचे संचालक तथा जेष्ठ पत्रकार गजानन ( बापू ) आहेर यांचे काल ( दि.१६ ) ऑगस्ट रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले..बापूंची exit मनाला काहीशी चटका लावून गेली..काल संपूर्ण दिवस त्या कुटुंबियांच्या अगदी जवळ असतांना त्यांना झालेले दुःख पाहून मन हेलावले..सकाळी 'बापू' गेल्याची बातमी समजली.. थोडा वेळ विश्वासच बसेना.. मात्र खात्री झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून निधनाची बातमी इतरत्र कळवली.. तेव्हापासून बापूंची विचारणा करणारे असंख्य कॉल माझ्याकडे सुरु झाले..ते सायंकाळी अंत्ययात्रा निघेपर्यंत सुरूच होते..नातेवाईक,मोठा मित्र परिवार व आपल्या वृत्तपत्र एजन्सी व्यवसायातून वाढवलेले संबंध असा सर्वांचा ओघ दिवसभर बापूंच्या घरी सुरूच होता..बापूंच्या सहवासातील अनेक आठवणी त्यांनी विशद केल्या..पत्रकार संजीव धामणे, पत्रकार भास्कर कदम यांच्या डोळ्यातील क्षणा क्षणाला ओघळणारे अश्रू तर सारं काही दुःख सांगून जात होते..तर रात्री उशिरा देखील अंत्ययात्रेत उपस्थित असलेला जनसागर त्यांच्या चांगुलपणाची जाणीव करून देत होता..अचानकपणे बापूंच्या जाण्याने संपूर्ण नांदगावकरांवर या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे...
अतिशय विनोदी स्वभाव असलेले मनमिळावू नेहमीच हसतमुख असणाऱ्या बापूंना..
भावपूर्ण श्रद्धांजली...!
- संदीप जेजुरकर,नांदगाव
No comments:
Post a Comment