नांदगाव : संदीप जेजुरकर
काल ( दि.३१ ) श्री.बाळासाहेब गायकवाड,मोठी होळी नांदगाव ( नाशिक ) यांच्या घरावर जखमी अवस्थेत हा 'एक अनाहुत पक्षी' आढळला..अनेकदा त्याने उडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या पंखात उडण्याचं बळ नसल्याने तो उडू शकत नव्हता...वनविभागाच्या सूर्यवंशी दादा,सुनील खंदारे,गोपाल राठोड यांना बोलावून या पक्ष्याला त्यांच्या ताब्यात दिले..पक्षी प्रेमी व सर्प मित्र असलेल्या दिपक घोडेराव यांना बोलावून त्यांच्याकडून या पक्षाविषयी माहिती घेतली असता त्यांनी त्या पक्षाची ओळख " कुदळ्या पक्षी "अशी सांगत त्यांचे खाद्य मासे किंवा पाण्यातील छोटे किटक असल्याचे सांगितले त्यानंतर पशु वैद्यकीय दवाखान्यात त्या पक्ष्यास उपचारासाठी नेल्यानंतर प्राथमिक तपासणीत त्याला कुठेही जखमा आढळल्या नाही परंतु अशक्तपणा आल्याने त्यास ग्लुकोज अथवा काहीतरी खायला द्यावे लागेल असे डॉ.सांगितले..लागलीच वनविभागाच्या सूर्यवंशी दादा व सुनील खंदारे,गोपाल राठोड यांनी त्यास खाद्य म्हणून मासे व ग्लुकोजची उपलब्धता करून देत वनविभागाच्या एका कार्यालयात सुरक्षितरीत्या ठेवत त्याचा मस्त पाहुणचार केला...
पक्षी प्रेमी व सर्प मित्र असलेल्या दिपक घोडेराव यांनी कुदळ्या पक्षी विषयी दिलेली माहिती...
कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेरा तलावाजवळ,जिथे पाणथळीची जागा असेल तर तिथे हे हमखास आढळणार...आपल्याकडे आढळणारा 'काळा कुदळ्या' हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात तर डोक्यावर गडद लाल धब्बा असतो..कुदळ्यांच्या चोची लांब, खाली वाकलेल्या आणि एखाद्या कुदळीच्या पात्यासारख्या असतात. ह्या लांब आणि वक्राकार चोचीमुळे त्यांना चिखलाच्या आत दडलेले प्राणी, खेकडे, मासे पकडणे सोपे जाते..
- संदीप जेजुरकर
नांदगाव ( नाशिक )
सुंदर लेख आणि माहीती संदिप ।
ReplyDelete